शैक्षणिक उपक्रम

शैक्षणिक:

गरीब गरजू विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके यांचे वाटप केले आहे. त्याचप्रमाणे युनिफॉर्म, त्यांची परीक्षा फी भरण्यासाठी मदत मिळवून दिली आहे. प.स.जि.प. माध्यमातून मोफत सायकली शिष्यवृत्त्या मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न. शाळांना विविध संस्थांच्या माध्यमातून खासदार, आमदार यांच्या माध्यमातून संगणक मिळवून दिलेत. विविध परीक्षा घेऊन वक्तृत्व स्पर्धा, विविध संस्कृती कार्यक्रम आयोजित करून त्यांच्या कला गुणांना वाव देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे. त्यांच्यातील अभ्यासू वृत्ती वाढावी म्हणून अनेक व्याख्याने, चर्चासत्रे, मार्गदर्शन शिबिरे, आरोग्य शिबिरे, शैक्षणिक साली यांचे आयोजन केलेले आहे. व यातूनच शिवसेनेचे विचार त्यांच्या पर्यंत पोचविण्याचे काम केले आहे.


माहिती व तंत्रज्ञान:

आजच्या माहिती तंत्रज्ञान युगात ग्रामीण भागात प्रत्येक युवक-युवतींना संगणकाचे प्राथमिक ज्ञान मिळावे या उद्देशाने मौजे खेड-शिवापूर येथे एकात्मता ग्रामीण विकास संस्थेची स्थापना करून सादर संस्थेच्या माध्यमातून शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मोफत संगणक प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन केले आहे. तसेच व्यक्तिमत्व विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वाना स्वकर्तुत्वावर उभ्या राहाव्या यासाठी प्रयत्नशील राहिलो आहे.

मा. आमदार शररव ढमाले यांच्या निधीतून शिवभूमी विद्यालय खेड-शिवापूर, न्यू इंग्लिश स्कूल-खामगाव, प्राथमिक शाळा डोणजे यांना प्रत्येक एक संगणक संच दिले आहेत.

विद्यार्थ्यांचा फी माफीसाठी आंदोलने केली आहे. खेड-शिवापूर येथील दलितांना नागरी सुविधा मिळाव्या म्हणून महामार्ग कर. ४ रस्ता रोको आंदोलने.

शिवनेरी प्रतिष्ठान स्थापन करून त्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत. विद्यार्थ्यांना अनेक योजनांचा फायदा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहिलो आहे.

भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी काम केले आहे.


संतोष कोंडे
निष्ठावंत शिवसैनिक
खेड-शिवापूर, पुणे