माझ्याविषयी

सप्रेम जय महाराष्ट्र

खेड-शिवापूर गावाचे काम करीत असताना हिंदू-मुस्लीम गरीब-श्रीमंत पक्षीय स्वरूपाचा भेदभाव न करता गरज लागेल त्याला त्याठिकाणी सर्व सहकारी तरुणांना बरोबर घेऊन उपस्थित राहून सर्व सामान्य लोकांना मदत करणे गावातील पारायण सोहळा, पालखी मिरवणूक, दिंडी व्यवस्था, लग्न कार्य, इतर कार्य तन मन धन लावून पार पाडली आहेत. सर्वाना बरोबर घेऊन संपूर्ण ग्राम स्वच्छता करणे. गटारे साफ करणे. गावातील मंदीरे स्वच्छ करणे गायमुखे,पाणी पुरवठयाची स्वच्छता ठेवणे. हिंदू-मुस्लीम दलित कोणताही भेदभाव न करता गरज लागेल त्याला रक्तदान करणे दुष्काळग्रस्थ काळात गावातील भागातील ओढयावर पोत्यांचे बंधारे बांधले आहेत. सर्व सामान्य लोकांच्या लग्नकार्यात सहभाग घेऊन कार्य निर्विघ्नपणे पार पाडली आहेत. भागातील धार्मिक कामात कायम सहभागी झालो आहे.गोरगरीबांवर अन्याय झाला तेव्हा त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलो आहे.

शिवसेनेच्या माध्यमातून विधानसभा व लोकसभा निवडणुकीत मा.श्री.नंदू घाटे व मा. श्री. वसंतराव खाटपे यांच्या प्रचारास सुरुवात केली पुढे १९९२ पंचायत समितीच्या निवड्नुकी मध्ये मा. श्री दिनाभाऊ कोंडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पुरस्कृत उमेदवार मा. श्री. शिवजी वासवंड यांना निवडून आणण्यास मोलाचे कार्य केले. पुढे १९९५-९६ ग्रामपंचायत निवडणूक खेड-शिवापूर वर भगवा फडकविला.ग्रामपंचायतीच्या माध्यमातून समाज उपयोगी विकासाची अनेक कामे केली. १९९७ च्या पंचायत समितीच्या निवडणुकीत सहकारी मा. श्री. सोमनाथ आबा लांडगे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.त्यावेळी पंचायत समिती जिल्हा परिषद आमदार खासदार सर्व लोकप्रतिनिधी विरोधी पक्षाचे असल्याने कामामध्ये असंख्य अडचणी आल्या परंतु न डगमगता सर्व ठिकाणी भगवा डौलाने फडकत ठेवला.पुढे विभाग प्रमुख पदी निवड झाल्यानंतर सर्वाना बरोबर घेऊन गावोगावी शिवसेनेच्या शाखाची स्थापना व पुनर्बांधणी केली.जि.पं.निवडणूक २००२ मध्ये शिवसेनेचे पदाधिकारी खेड-शिवापूर हे गाव सर्वात मोठे असल्यामुळे खेड-शिवापूरचा कार्यकर्ता म्हणून मा.श्री.दिनाभाऊ कोंडे किंवा रमेश कोंडे तू उमेदवारी घे म्हणत असताना पक्षासाठी पंचायत समिती निवडणुकीत एक वेळ पराभूत झालेले मा.श्री.सोमनाथ लांडगे यांना उमेदवारी द्यावी म्हणून शिफारस केली व उमेदवार निवडून आणतो असे सांगीतले .व निवडणुकी मध्ये तन मन धन यशस्वी प्रचार यंत्रणा राबवून ता. हवेली तालुक्यातील पंचायत समिती व जि.पं.याठिकाणी मा.श्री.बापूसाहेब चव्हाण व मा.श्री सोमनाथ आबा लांडगे यांना निवडून आणून भगवा फडकविला.

पंचायत समिती व जिल्हा परिषद प्रतिनिधींच्या माध्यमातून जनतेची अनेक कामे केली अडीअडचणी सोडविल्या अनेक योजनांचा फायदा लोकांना मिळवून दिला. उपतालुका प्रमुखपदी निवड झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार मा.श्री.शिवाजीराव पाटील यांची यशस्वी प्रचार यंत्रणा रावबून पश्चिम ता. हवेली व भोर वेल्हा या भागात शिवसेनेला मताधिक्य मिळवून देण्यात यशस्वी झालो.पुढे विधानसभेच्या निवडणुकीसाठी मुळशी ता. हवेली मतदार संघाचा प्रतीनिधी म्हणून शिवालय या ठिकाणी निवडणूक प्रशिक्षणासाठी उपस्थीत राहून सर्व प्रचार यंत्रणा आत्मसात करून घेऊन पश्चिम ता. हवेली भोर वेल्हा या भागात यशस्वी पणे राबवून मा.श्री.शरदरावजी ढमाले यांना आमदार म्हणून निवडून आणण्यात या विभागाचा प्रचार प्रमुख ही भूमिका यशस्वी पणे बजावली आहे.व या भागातून शिवसेनेला मताधिक्य मिळवून देण्यात यशस्वी झालो.

खेड-शिवापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मध्ये निवडणुकीचा प्याणेल तयार केला परंतु निवडणूक बिनविरोध झाली. शिवसेनेच्या विचारांचे तेरा पैकी सात सदस्य निवडून आणण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. पुढे २००५ साली ग्रामपंचायत खेड-शिवापूर निवडणूक पनेल प्रमुख म्हणून लढवली. विरोधात पंचायत समिती सभापती पद ११ वर्ष, मार्केट कमिटीवर १० वर्ष सभापती पद भूषविलेली बडी मंडळी असताना मा.श्री.शिवसेनाप्रमुख यांच्या आशीर्वादाने अकराच्या अकरा उमेदवार निवडून आणून ता. हवेली तालुक्यात प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या निवडणुकीत खेड खेड-शिवापूर ग्रामपंचायतीवर भगवा फडकविण्यात यशस्वी झालो. नंतर वर्षभराच्या काळात लाखो रुपयांच्या योजना राबवल्या व योजनांचा फायदा लोकांना मिळवून देण्यात यशस्वी झालो. शिवसेनेचा शिवसैनिक पदाधीकारी असल्यापासून झालेल्या कोणत्याही निवडणुकीत, विरोधकांना एकदाही गुलाल उधळण्याची संधी मिळू दिलेली नाही.

संतोष कोंडे
निष्ठावंत शिवसैनिक
खेड-शिवापूर, पुणे