सांस्कृतिक उपक्रमउत्सव:
श्री गणेश उत्सव खेड-शिवापूर गावातील आठ मांडले एकत्र करून “एक गाव एक गणपती” राबविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दिमाखात साजरी करून त्याच्या माध्यामतून हिंदुत्वाचे विचार , विविध मनोरंजनाचे कार्यक्रमातून लोकांपर्यंत पोचविण्याचे कार्य केले. माता भगिनींना या उत्सवात सहभागी करून घेऊन शिवसेनेचे विचार पटवून देण्याचे महान कार्य घडविले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेकर, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती दलित बांधवाना बरोबर घेऊन उत्साहात साजरी केली.
खेड-शिवापूर दलित वस्तीतील लोकांना नागरी सुविधा मिळाव्यात म्हणून सदैव संघर्ष केला आहे. त्यांच्या मुलांना विविध योजनानाच्या माध्यमातून मदत मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. वर्षभराच्या सरपंच पदाच्या मानधनातून लोक.अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त वह्यांचे वाटप केले आहे. पं.जि.पं.स. व उद्योग्केंद्राच्या माध्यमातून भरीव मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला आहे. मागासवर्गीय सेवा संस्थेची स्थापना करून त्यांच्या माध्यमातून अनेक योजना त्यांच्यापर्यंत पोचविण्याचे कार्य केले आहे. इंदिरा आवास योजनेच्या माध्यमातून दारिद्र्य रेषेच्या खालील लोकांना घरे बांधून देण्यासाठी प्रयत्न केला आहे. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाना बँकेच्या माध्यमातून व्यवसायासाठी सवलतीच्या दारात कर्ज उपलब्ध करून दिले आहे.
![]() | ![]() |
![]() | ![]() |





