माझ्या संकेत स्थळावर आपले स्वागत आहे.सप्रेम जय महाराष्ट्र,
आदरणीय शिवसेनाप्रमुख मा श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा पाईक म्हणून जनतेचा सेवक म्हणून शिवसेनाप्रमुख यांच्या आशीर्वादाने खानापूर – खेड-शिवापूर जि.प. मतदार संघाचा इच्छुक उमेदवार खंडू उर्फ रमेश आनंदराव कोंडे म्हणून माझा अल्प परिचय करून देत आहे.
खेड-शिवापूर येथील एक सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील एक मुलगा इ. १० मध्ये शिवभूमी विद्यालयात प्रथम आलेला पुढे कला शाखेची पदवी ग्रहण करीत असलेला शालेय जीवनापासून सर्वाना एकत्र बरोबर घेऊन काम करण्याची सवय असणारा मनमिळाऊ स्वभावाचा क्रिकेट संघाच्या माध्यामातून शाळेतील गावातील भागातील तरुणांना एकत्र करून वेगवेगळया स्पर्धेत भाग घेऊन अनेक पारितोषिके/बक्षीसे मिळवून शाळेचे गावाचे भागाचे नाव उज्वल केलेले आहे. !!


