क्रीडा क्षेत्रासाठी केलेली कार्ये.शिवसेनाप्रमुख मा.श्री.बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य शिवगंगा सेना कुस्ती स्पर्धा भरविणे, चांदीची गदा बक्षीस, भजन स्पर्धा, कबड्डी स्पर्धा, सायकल रेस, हॉलिबॉल स्पर्धा, असे वेगवेगळे उपक्रम घेणे.
क्रीडा क्षेत्रासाठी देखील अलक्षणीय काम केले आहे. तालुक्यातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्य पुरविले. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी विविध स्तरावर उत्तम अशी कामगिरी केली आहे.
अशा विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना बक्षिसे देखील दिली आहेत. त्याप्रमाणे इतर खेळामध्ये ज्या खेळाडूंनी तालुका व जिल्हा स्तरावर उत्तम कामगिरी केली आहे. अशा खेळाडूंचे मनोबल उंचाउन त्यांना पुढील कामगिरीसाठी आर्थिक मदत देखील केली.
दरवर्षी विविध खेळांचे आयोजन करून खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने विविध सामने भरवतात.
प्लास्टिक चेंडूवरील भव्य नाईट क्रिकेट सामन्यांचे आयोजन करून तालुक्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देतात. त्याच प्रमाणे टेनिस चेंडूवरील क्रिकेट सामने, आंतरशालेय क्रीडा स्पर्धा, उन्हाळी प्रशिक्षण शिबिरे भरवण्यासाठी नेहमी तत्पर असतात.
![]() | ![]() |
![]() | ![]() |





